जबलपूर – राष्ट्रीय स्पर्धा, विश्वकरंडक व अल्टिमेट लीग यांसारख्या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनानंतर आता खो-खो या खेळाचा समावेश आशियाई क्रीडा स्पर्धेत स्थान मिळवून देण्याचे प्रयत्न महासंघ करत आहे, अशी माहिती भारतीय खो-खो महासंघाने दिली आहे.
जगातील 36 देशांत खो-खो खेळले जाते. अर्जेटिना, फ्रान्स, इराण, कोरिया यांसारख्या देशांचा समावेश आहे. आता येत्या नव्या वर्षात आणखी 76 देशांत हा खेळ पोहोचवण्याचे महासंघाचे उद्दीष्ठ महासंघाने ठेवले आहे.
आफ्रिका, युरोप आणि दक्षिण अमेरिका खंडात खो-खोच्या स्पर्धाच्या आयोजनाचे लक्ष्य आहे. त्यात जर यश आले तर 2026 सालच्या आशियाई स्पर्धेत खो-खो या खेळाला निश्चितच स्थान मिळेल, असेही महासंघाने सांगितले आहे.