ओमानजवळ इस्रायली तेल टॅंकरवर हल्ला; 2 ठार

दुबई  – इस्रायली अब्जाधीशाच्या मालकीच्या एका तेलाच्या टॅंकरवर अरबी समुद्रात ओमानजवळ झालेल्या हल्ल्यामध्ये किमान दोघेजण ठार झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. 

गुरुवारी रात्री मर्सेस स्ट्रीट या तेलवाहू टॅंकरवर झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी त्वरित कोणीही घेतली नाही. या हल्ल्यासाठी आत्मघातकी ड्रोन वापरण्यात आल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे एखाद्या देशाचा अथवा दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्‍यता वाढीस लागली आहे.

या तेल टॅंकरवर झालेल्या हल्ल्याचे वृत्त समजताच अमेरिकेचे नौदल घटनास्थळीी रवाना झाले. त्यानंतर हल्ला झालेले तेलवाहू जहाज सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले आहे, असे लंडनस्थित जहज व्यवस्थापन कंपनीने काल सांगितले.

2019 नंतर या भागातल्या जहाजांवर अशाप्रकारे हल्ले झाले नव्हते. त्यानंतर प्रथमच अशाप्रकारचा हल्ला झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरले आहे. इराणबरोबरच्या आण्विक कराराच्या मुद्द्यावरून इराणने पाश्‍चात्य देशांबाबत कठोर भूमिका घेतलेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.