स्वनिधी योजनेअंतर्गत 2,243 कोटीचे कर्ज

नवी दिल्ली – महामारीच्या काळात विपरित परिणाम झाल्यामुळे शहरी भागात रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या, व्यावसायिकांना 1 वर्षाच्या कालावधीसाठी 10,000 पर्यंत भांडवली कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री पदपथ व्यावसायिक आत्मनिर्भर निधी योजनेसाठी 26 जूनपर्यंत 43.1 लाख कर्जासाठीचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 25.2 लाख कर्जे मंजूर करण्यात आली. 22.7 लाख कर्जांची रुपये 2,243 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आली.

24 मार्च 2020 किंवा त्यापूर्वी शहरी भागांमध्ये रस्त्यावर विक्री करणारे व्यावसायिक पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र आहेत. महाराष्ट्रामध्ये, 26 जुलै 2021 किंवा त्यापूर्वी, 1.6 लाख पदपथ व्यावसायिकांना रुपये 164 कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले. मुंबई आणि पुणे येथे, अनुक्रमे 6,395 आणि 6,169 पदपथ व्यावसायिकांना कर्जाची रक्कम वितरित करण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह 14,094 लाभार्थ्यांची आर्थिक माहिती पूर्ण करण्यात आली. महाराष्ट्रात योजनेचा लाभ 7,998 इतका वाढविण्यात आला आहे.
महाराष्ट्रामध्ये 26 जुलै किंवा त्यापूर्वी कर्जासाठी 4.2 लाख अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 1.9 लाख कर्जे मंजूर करण्यात आली आणि 1.6 लाख कर्ज अर्जांची रक्कम वितरित करण्यात आली.

मुंबईमध्ये, कर्जासाठी 21,527 इतके अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 8,526 इतके अर्ज मंजूर झाले आणि 6,395 कर्ज अर्जांची रक्कम वितरित करण्यात आली. पुण्यामध्ये, कर्जासाठी 12,107 अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 6,946 अर्ज मंजूर झाले आणि 6,160 कर्ज अर्जांची रक्कम वितरित करण्यात आली. ही माहिती गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री कौशल किशोर यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.