मांजरी – “कचरा हा शहरासह आता प्रत्येक गावचा ज्वलंत विषय झालेला आहे. भविष्यातील गरज ओळखून वस्तीवस्तीवर त्याचे व्यवस्थापन होणे गरजेचे झाले आहे. मांजरी खुर्द गावातील अथर्व सृष्टी गृहप्रकल्पामध्ये सुरू केलेला कचरा व्यवस्थापन प्रकल्प इतर गावांना दिशा देण्याचे काम करेल,’ असा विश्वास उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी व्यक्त केला.
मांजरी खुर्द (ता.हवेली ) मधील अथर्व सृष्टी गृहप्रकल्पामध्ये स्वच्छ संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी सरपंच सिताराम उंद्रे, माजी उपसरपंच प्रकाश सावंत, किशोर उंद्रे, अथर्वसृष्टीचे संचालक महेश थोरात, जगदीश उंद्रे, सचिन गाढवे, विकी माने, नाथाभाऊ उंद्रे, अशोक आव्हाळे, स्वच्छचे सहाय्यक विभागीय समन्वयक रवींद्र गायकवाड, झिरो वेस्ट फेसिलेटर स्नेहल गळंगे, सुषमा थोरात, स्वाती पवार, रविंद्र झेंडे, अनिल थोरात, आप्पा काकडे आदी यावेळी उपस्थित होते.
सोसायटीचे प्रशांत बडूरे, प्रमोद पाटील, गिरीश जोशी, किशोर शिंदे, गणेश सोनटक्के, प्रकाश नाटकर, विजयसिंह पवार, ओंकार पडवळ, महादेव पाचपुंड, प्रदीप सुतार, मारुती तोडकर, स्वप्निल पवार, एम. एम. खान, सतीश बावणे, विशाल काळे, बाबुराव नेवाळे आदींनी संयोजन केले.