मंचर – नागापूर (ता. आंबेगाव) येथील मिंडे मळ्यात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (दि. 1) पहाटे साडेसहाच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी दिली. गेल्या दोन महिन्यांपासून नागापूरच्या उत्तरेला असलेल्या मिंडे मळ्यात बिबट्याचा वावर होता.
याबाबत सरपंच सुजाता रिठे, पोलीस पाटील संजय पोहकर यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. वनपरीक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मिंडे मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. या बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात सोडण्यात आले आहे.