जळोची- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून बारामतीत दत्त सेवेकरी मंडळाचे चंद्रकांत सावंत, जालिंदर उगाडे,श्रीकांत पाथरकर, यशवंत अवघडे व सहकाऱ्यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात असणाऱ्या रक्ताचा तुटवडा विचारात अण्णाभाऊंच्या शंभराव्या जयंती निमित्त शासकीय नियमांचे पालन करून येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित तसेच स्व. माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक येथे बारामती शहरातील दत्तसेवकरी मंडळ बारामती, यांच्यावतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी अनेक समाज बांधवांनी विशेषता लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले. सदर शिबिरासाठी संतोष जगताप, दिनेश सोनवणे, शुभम भिसे, कुणाल लांडगे, विजय मोरे, अविनाश दुर्वे, गणेश अवघडे, सनी अवघडे यांनी विशेष परिश्रम घेतले.