चिंबळी – येत्या नवीन शैक्षणिक वर्षांपासून कमळजाई नगर (मरकळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाचवीच्या वर्गाची सुरवात होईल, अशी घोषणा मरकळचे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कैलास लोखंडे यांनी केली. कमळजाई नगर (मरकळ, ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळात सीएसआर फंडातून बांधण्यात आलेल्या दोन वर्गखोल्यांचे नुकताच लोकार्पण सोहळा पार पडला.
क्लोराईड मेटल्स लिमिटेड कंपनीच्या सीएसाअर फंडातून या वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात आले. त्याचे उद्घाटन कंपनीचे मुख्य कार्यकारि अधिकारी डी. जे. बॅर्नजी, महाव्यवस्थापक राजीव दत्ता, वित्त नियंत्रक मिलिंद हैरलेकर, उपमहाव्यवस्थापक शांताराम मोलाबडे, मुख्य व्यावसायिक अधिकारी बळवंत कुलकर्णी, संजय मोकाशे, विठ्ठल मुक्काम आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी वरील घोषणा करण्यात आली.
यावेळी काळूराम भागूजी लोखंडे, सुनील लोखंडे, संतोष लोखंडे, संत तुकाराम महाराज कारखान्याचे संचालक अनिल लोखंडे, सरपंच स्मिता लोखंडे, उपसरपंच लालाशेठ लोखंडे तृप्ती लोखंडे, मंगल खांदवे कैलास लोखंडे, भगवान लोखंडे, कैलास वर्पे, काळुराम लोखंडे, लहु वर्पे, शाळा कमिटीचे अध्यक्ष शिवाजी लोखंडे, सोमनाथ कहांडळ, विजय लोखंडे, राम लोखंडे,सुधीर लोखंडे, दीपक लोखंडे, मरकळ केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश कातोरे, मुख्याध्यापिका अलका ओव्हाळ, सुरेखा शीरसाठ, शाळा प्रमुख राजश्री ढुके, शिक्षिका माया कांबळे, रेखा चव्हाण, अंगणवाडी शिक्षिका माया ढेंगळे, मदतनीस छाया चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कमळजाईनगरातील मुलांच्या शिक्षणासाठी कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेबद्दल अनिल लोखंडे यांनी णनिर्देशन मानले. तसेच कंपनीने सदैव असेच मायेचे शैक्षणिक छत्र या गावावर ठेवावे, असे आवाहन सर्व ग्रामस्थांनी केले. यानंतर अनिल लोखंडे यांचा वाढदिवस शाळेतील बालगोपाळांनी साजरा करून त्यांना उदंड आयुष्या लाभो या सदिच्छा दिल्या. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन शिक्षक विनोद चव्हाण यांनी तर शाळाप्रमुख राजश्री ढुके यांनी आभार मानले.