पुणेकरांसाठी पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचा महत्वाचा संदेश
सर्वांना सूचना देण्यात येत आहेत की आता मा. पंतप्रधानांनी लॉकडाउन संदर्भात जी घोषणा केली त्या संदर्भात पुणे शहरात या पूर्वीच CrPC 144(1) (3) अन्वये २ आदेश ( जमावबंदी व वाहन व वाहतुक बंदी )निर्गमित केले आहेत. त्यातील तरतुदी हया आता केलेल्या घोषणेप्रमाणेच बहुतांशी आहेत.
त्यामुळे नागरीकांनी सम्भ्रमित होवू नये. यापुढ़ेही सर्व जिवनावश्यक वस्तु व सेवा, तसेच अत्यावश्यक सेवा सूरू राहतील. पोलीस व नागरी प्रशासन हया सेवा व पुरवठा सुरु ठेवण्यासाठी कटीबद्ध आहे. कृपया पोलीस प्रशासन व नागरी प्रशासन यांना सहकार्य करावे.
कुणीही अफवा पसरवू नयेत. हया नवीन आदेशानुसार आता हे नियम 14 एप्रिल पर्यंत लागू राहतील तसेच national disaster management Act मधील तरतुदीचा वापर प्रशासनास करता येइल.
कृपया सहकार्य करावे
डॉ रवींद्र शिसवे
पोलीस सह आयुक्त
पुणे शहर