नवी दिल्ली – करोनापासून बचावामुळे देशभरात लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात देशात अडकलेल्या 769 परदेशी पर्यटकांची माहिती आत्तापर्यंत मिळाली असून त्यांना आवश्यक मदत पुरवली असल्याचे केंद्र सरकारनं स्पष्ट केले आहे.
संचारबंदीमुळे देशाच्या विविध भागात अडकेल्या परदेशी पर्यटकांचा शोध घेऊन त्यांना मदत करण्यासाठी सरकारने ww.strandedinindia.com हे संकेतस्थळ सुरू केले असून, त्यावर गेल्या पाच दिवसांमध्ये या 769 परदेशी नागरिकांनी आपली माहिती दिली. भारतात अडकलेले परदेशी पर्यटक मदतीसाठी या संकेतस्थळाला भेट देऊन आपली माहिती नोंदवू शकतात.