जम्मू आणि कश्‍मीरमधे लवकरच विधानसभा निवडणूका

– नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुरमू

श्रीनगर : जम्मू आणि कश्‍मीरमधे लवकरच विधानसभा निवडणूका घेतल्या जातील, असे जम्मू कश्‍मीरचे नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुरमू यांनी सांगितले. ते काल जम्मू विभागातल्या रेआसी जिल्ह्यात तलवारा इथे राज्य पोलीस दलाच्या दिक्षांत संचलनानंतर बोलत होते.

जम्मू आणि कश्‍मीरमधे शांतता कायम राखण्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी पोलीसांचे कौतुक केले. शांतता कायम राखताना पोलीसांनी महान त्याग केल्याचे सांगत, निवडणूकामधेही पोलीसांची मुख्य भूमिका असेल, असे मुरमू यावेळी म्हणाले.
नुकत्याच झालेल्या बर्फवृष्टी आणि हवामानाच्या विदारक परिस्थितीचा संदर्भ देताना नायब राज्यपाल म्हणाले की, मदत आणि बचाव कार्यांसाठी पोलिस दलाचे सहकार्य अत्यंत आवश्‍यक आहे. कल्याणकारी योजना पूर्ण मनाने व समर्पणाने त्वरित राबवून केंद्रशासित प्रदेश विकसित करण्याची जबाबदारी सर्व लोकांची आहे, असेही ते म्हणाले.

Remarks :
पान 1

Leave A Reply

Your email address will not be published.