‘कोप्पा’ कायद्यामुळे युट्युबच्या सेटींग्जमध्ये बदल अनिवार्य

नवी दिल्ली – भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरुंचा जन्मदिन म्हणून भारतात सर्वत्र बालदिन साजरा होत असतानाच 13 वर्षांखालील मुलांच्या गोपनीयतेचा भंग होऊ नये म्हणून युट्युबच्या सेटींग्जमध्ये नवे बदल लागू करण्यात आले आहेत.

लहान मुलांच्या ऑनलाइन गोपनीयता संरक्षण कायदा (चिल्ड्रन ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्‍शन ऍक्‍ट सीओपीपीए-कोप्पा) हा वर्ष 1998 चा अमेरिकन कायदा असून त्यायोगे 13 वर्षाखालील मुलांच्या ऑनलाईनविषयक माहितीचे रक्षण केले जाते.

या कायद्यानुसार युट्युबसह सर्वच डिजिटल घटकांनी त्यांचे पालक किंवा पालकांच्या स्पष्ट परवानगीशिवाय 13 वर्षाखालील वापरकर्त्यांकडून त्यांची वैयक्तिक माहिती गोळा करण्यास प्रतिबंध लावण्यात आले आहेत.

आजपासून, युट्युबवर व्हिडीओज अपलोड करणाऱ्या सर्व निर्माणकर्त्यांनी लहान मुलांच्या ऑनलाइन गोपनीयता संरक्षण कायदा (COPPA) आणि/किंवा लागू असलेल्या इतर कायद्यांचे पालन करण्यासाठी, त्या व्हिडीओजचा आशय लहान मुलांसाठी तयार केलेला असल्यास ते युट्युबला सांगणे आवश्‍यक आहे.

या कायद्यांचे पालन करण्यासाठी वापरकर्त्यांनी युट्युबच्या सेटींग्जमध्ये बदल करायला सांगण्यात आले आहे. कोणत्याही युट्युब चॅनेलव “मुलांसाठी तयार केलेला आशय’ यावर आधारित त्या-त्या चॅनलने “प्रेक्षक वयोगट पातळी’ किंवा “व्हिडिओ पातळी’ सेट कन्णे आवश्‍यक ठरणार आहे.

युट्युबने म्हटले आहे की, हे सेटींग्ज एका क्‍लिकवर करणे वापरकर्त्यांना शक्‍य आहे. तरिही आम्हाला माहीत आहे की, काही निर्माणकर्त्यांसाठी हे बदल सोपे नसतील आणि या आवश्‍यक बदलाची सवय होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. पण कायद्याचे पालन केल्याची खात्री करण्यासाठी या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

आजपासून, सर्व निर्माणकर्त्यांनी त्यांच्या युट्युब स्टुडिओमध्ये त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओजवर “मुलांसाठी तयार केलेला’ किंवा “मुलांसाठी तयार केलेला नाही’ अशी खूण करणे आवश्‍यक आहे. येत्या जानेवारी 2020 पासून कोप्पा कायद्याचे पालन करण्यासाठी मुलांसाठी तयार केलेल्या आशयावरील डेटा गोळा करण्यास मर्यादित प्रमाणात सुरुवात होणार आहे.

याचा अर्थ असा आहे की, युट्युब पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती (ज्या मुलांसाठी आशय तयार करणाऱ्या निर्माणकर्त्यांच्या कमाईवर परिणाम करतात) तसेच टिप्पण्या, सूचना आणि इतर यांसारखी काही वैशिष्ट्ये बंद करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.