पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला नेहमीच मतदान कमी होते. त्यामुळे, महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग या भागात असल्याने घडळयाला मतदान करायला सांगा असे आवाहन महायुतीमधील घटकपक्षांना केले असल्याची माहितीराष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन बुधवारी धायरी येथे करण्यात आले होते.
यावेळी पवार यांंनी हे आवाहन केले. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील ,शिवसेना संपर्क प्रमुख संजय माशेलकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
पवार म्हणाले की, महायुतीकडून विधानसभा निहाय मेळावे घेतले जात आहेत. मात्र, खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजप शिवसेनेचा वरचष्मा आहे. आम्ही सगळे महायुतीत असलो तरी या भागात घडयाला भाजप शिवसेनेचे मतदार मतदान करत नाहीत. त्यामुळे मेळाव्याच्या अनुषंगाने मतदारांना सांगा बारामती शिरुर मध्ये आपले चिन्ह घड्याळ आहे हे सांगण्याचे आवाहन केले आहे.
मनसेचा महायुतीला फायदाच
यावेळी मनसे महायुतीत आल्यास आम्हाला फायदाच होणार असल्याचे सांंगत पवार यांनी मनसेचे स्वागत केले आहे. महायुती मध्ये आणखीन काही पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न अमित भाई यांच्याकडून सुरू आहे त्या संदर्भात मनसेची देखील चर्चा सकारात्मक सुरू आहे त्याचा महायुतीला फायदाच होणार असल्याचे यावेळी त्यांनी माध्यमांंशी बोलताना सांगितले