Lok Sabha Election 2024 । उद्या गुरुवारी (ता. 21 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी मविआची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत लोकसभेच्या प्रचाराची पुढील रणनीती आखण्यात येणार असल्याचे राऊतांकडून सांगण्यात आले आहे.
संजय राऊत म्हणाले की, निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासूनच उद्धव ठाकरे यांचे दौरे सुरू आहेत. आम्ही थांबलेलो नाही. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाच्या संयुक्त सभा होत आहेत.
त्यासंदर्भात उद्या गुरुवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी मविआची बैठक होणार आहे. उद्या सकाळी ही बैठक होणार असून त्याच्या माध्यमातून पुढील कार्यक्रम आखला जाणार आहे.
पण नावांच्या याद्या आलेल्या नसल्या तरी निवडणुका अडलेल्या नाहीत आणि महाराष्ट्रातील 48 जागांवर मविआचा उमेदवार उभा करण्यात येणार असल्याचे राऊतांकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे.