Asian Games 2023 (Squash Mixed Doubles) : आशियाई क्रीडा 2023 च्या स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळाले आहे. मिश्र दुहेरी स्क्वॉश स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी हे पदक जिंकले आहे. भारताची स्टार स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल सिंग या जोडीने अंतिम फेरीत मलेशियाच्या जोडीला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले.आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील स्क्वॉश मिश्र दुहेरीत भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
भारताच्या या जोडीने मलेशियाच्या महंमद शफीक व आयफा अझमान या जोडीवर 2-0 अशी मात केली. भारतीय जोडीने हा सामना 11-10, 11-10 असा अवघ्या 35 मिनिटांत जिंकला.
🥇𝐈𝐧𝐝𝐢𝐚𝐧 𝐒𝐪𝐮𝐚𝐬𝐡 𝐑𝐞𝐢𝐠𝐧𝐬 𝐒𝐮𝐩𝐫𝐞𝐦𝐞!🌟
Our dynamic mixed doubles team of @DipikaPallikal and @sandhu_harinder clinches GOLD, defeating Malaysia by a score of 2-0 in the final at #AsianGames2022!💥🥳
Join us in celebrating this golden achievement and sending… pic.twitter.com/d1GiaRVh4q
— SAI Media (@Media_SAI) October 5, 2023
अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारतीय जोडीने पहिला गेम 11-10 असा जिंकला. यानंतर दीपिका आणि हरिंदर दुसऱ्या सेटमध्ये 9-3 ने पुढे होते, परंतु मलेशियाच्या जोडीने बॅक टू बॅक पॉइंट घेत गुणसंख्या बरोबरी केली. येथून हरिंदरने दोन गुण मिळवले आणि दुसरा गेम 11-10 असा जिंकून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
मिश्र दुहेरी स्क्वॉशमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर दीपिका पल्लीकलचा पती क्रिकेटर दिनेश कार्तिकने ट्विट करून आनंद व्यक्त केला. त्याने दीपिका आणि हरिंदरच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ भारतीय क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरने रेकॉर्ड करून दिनेश कार्तिकला पाठवला आहे. दिनेश कार्तिकनेही आपल्या ट्विटमध्ये वॉशिंग्टन सुंदरचे आभार मानले आहेत.
Its gold time again 😍😍😍🏅🏅🏅
Well done @DipikaPallikal and harinder
Thanks @Sundarwashi5 for the video #GOLD#AsianGames2023 #Squash pic.twitter.com/N5PRRrhW5i
— DK (@DineshKarthik) October 5, 2023
दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेत दीपिकाने आपल्या मोहिमेचा शेवट दोन पदकांसह केला. कांस्यपदक जिंकणाऱ्या महिला संघातही तीचा समावेश होता. या 32 वर्षीय खेळाडूने चार आशियाई क्रीडा स्पर्धेत सहा पदके जिंकली असून त्यात एक सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे.