पुणे :- रोडिज अॅडव्हेंचर क्लब पुणे व पुणे मोटार्स स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोडिज ऑन हिल टाॅप ही दुचाकीस्वारांसाठी स्पर्धा घेण्यात आली. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावात 1 ऑक्टोबरला ही स्पर्धा झाली. यात पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर येथील जवळपास 90 दुचाकीस्वारांनी सहभाग घेतला होता.
मुख्य प्रायोजक व्यकंटसाई होंडा (धायरी), फूड पार्टनर एक्वारिस व ब्रह्मा हाॅटेल यांचे स्पर्धेला सहकार्य लाभले. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत दुचाकीस्वारांना विविध टास्क देण्यात आली होती. कमीत कमी वेळात ती पूर्ण करणाऱ्यांना बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेत 500 सीसी गटात अभिषेक धुमाळ प्रथम, नीरज वांजळे द्वितीय, निखिल कामते तृतीय, तर 250 सीसी गटात शिवकुमार पाटील प्रथम, लौकिक पास्ते द्वितीय आणि अभिषेक धुमाळ यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
प्रसिद्ध उद्योजक दत्तात्रेय कोल्हे, एक्वारिस व ब्रह्मा हाॅटेलचे मालक महेंद्र वालदिया, विशाल शहा, रामदास हगवणे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.