OMG 2 – बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा 2012 साली प्रदर्शित झालेला OMG चित्रपट (OMG 2) प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. यानंतर आता ‘OMG 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
यामध्ये अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसून आले. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल झाला होता.
दरम्यान, आता दोन महिन्यांनंतर ‘OMG 2’ हा सिनेमा ओटीटीवर (OTT) रिलीज होणार आहे. हा चित्रपट 8 ऑक्टोबर रोजी ओटीटीवर रिलीज होत आहे. नेटफ्लिक्सवर तुम्हाला हा चित्रपट पाहता येणार आहे.
अक्षयचा ‘OMG 2’ हा चित्रपट सनी देओलचा ‘गदर-2’ सोबत रिलीज झाल होता. दोन्हीही चित्रपटात चांगलीच टक्कर पाहायला मिळाली. एक मसाला एंटरटेनर होता, तर दुसरा सोशल मेसेज देणारा चित्रपट होता.