Asia Cup 2023 IND vs SL Final : आशिया कप 2023 च्या विजेतेपदाचा सामना आज भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला हे विजेतेपद जिंकून आपली तयारी मजबूत करायची आहे. कोणत्याही बहुराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेविरुद्ध भारताचा विक्रमही उत्कृष्ट राहिला आहे. अशा स्थितीत दासून शनाका संघाला भारतीय संघावर मात करणे सोपे जाणार नाही.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कप 2023 विजेतेपदासाठीची लढत काहीच वेळात सुरू होईल. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (Toss) कौल हा श्रीलंकेच्या बाजूनं लागला आहे. (SRI LANKA won the toss and elected to bat)कर्णधार दासून शनाका याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शनाकाने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. दुखापतग्रस्त महेश तिक्ष्णाच्या जागी हेमंता खेळत आहे. तर दुसरीकङे कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग-11 मध्ये सहा बदल केले आहेत. विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवचे पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर दुखापतग्रस्त अक्षर पटेलच्या जागी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली आहे. सुंदर ऑफ स्पिनर आहे. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शार्दुल ठाकूर, प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद शमी यांना वगळण्यात आले आहे.
दोन्ही संघाचे Playing 11 खालीलप्रमाणे :-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथिशा पाथिराना.
दरम्यान, वनडे असो वा टी-20, आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका सात वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी टीम इंडियाने चार सामने जिंकले, तर श्रीलंकेने तीन फायनल जिंकल्या.अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने येण्याची ही आठवी वेळ आहे. यापूर्वी 1988 आशिया चषक, 1990/91 आशिया चषक, 1995 आशिया चषक, 1997 आशिया चषक, 2004 आशिया चषक, 2008 आशिया कप, 2010 आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत.