पालेकेल्ले :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत दोन खेळाडूंना करोनाची बाधा झाल्याची शक्यता तसेच प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतींनी त्रस्त असलेल्या श्रीलंकेचा आज बांगलादेशशी सामना होत आहे.
सामन्यास तीन वाजता सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा बांगलादेशच्या बाजूनं लागला आहे.बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक(TOSS) जिंकली आहे. त्यांने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Bangladesh have opted to bat against Sri Lanka in the second #AsiaCup2023 match)आशिया चषक स्पर्धेतील हा दुसरा सामना आहे. त्याचवेळी, ब गटातील हा पहिलाच सामना आहे. या गटातील तिसरा संघ अफगाणिस्तान आहे.
दोन्ही संघ शेवटचे 2013 मध्ये पल्लेकेले येथे आमनेसामने आले होते आणि त्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंका संघाचा तीन विकेट्सने पराभव केला होता.तसेच श्रीलंकेने मागील वर्षी 2022 मध्ये (T20 फॉरमॅट) आशिया कप जिंकला होता.