पुणे : वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी एड. पांडुरंग थोरवे यांची निवड झाली आहे.
उपाध्यक्षपदी विवेक भरगुडे (२ हजार १३९ मते), लक्ष्मण येळे-पाटील (१ हजार ५५० मते), सचिवपदी एड सुरेखा भोसले (१ हजार ७६८ मते), एड. अमोल शितोळ (१ हजार ८१९ मते), ऑडिटरपदी शिल्पा कदम-बिराजदार (१ हजार ८८५ मते) विजयी झाले आहेत.
खजिनदार तसेच कार्यकारिणी सदस्यांची यापुर्वीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. अशोक संकपाळ आणि सहायक निवडणूक अधिकारी ॲड. मंगेश लेंडघर यांनी कामकाज पाहिले.