मंचर – शिवज्योत वाहण्याकरिता 200 भाविकांना आणि शिवजयंती उत्सवाकरिता 500 भाविकांना परवानगी देण्यात आली आहे. अटी व शर्तींच्या आधिन राहून करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावी, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी केले आहे.
मंचर (ता. आंबेगाव) येथील पोलीस ठाण्याच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शांतता कमेटी, मोहल्ला कमेटी व छत्रपती शिवाजी महाराज जयंती मंडळे यांची बैठक घेण्यात आली. खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीमध्ये महाराष्ट्र शासन, गृहविभाग यांच्याकडील मार्गदर्शक सूचना सांगण्यात आल्या.
यावेळी राजू ऊर्फ अथर अब्बास इनामदार, पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले, प्रवीण मोरडे, जे. के. थोरात,सुरेश निघोट, दत्ता थोरात, अल्लू ईनामदार, कमरअली जमालुद्दीन मण्यार, खालीद हाऊन इनामदार, रियाज जमादार, रहेबरअली मीर, बजरंदलाचे सूरज धरम, अक्षय चिखले, संदीप बाणखेले, सुहास बाणखेले उपस्थित होते. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.