Adam Master। सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. पण वंचित आणि एमआयएम यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघाचं गणित बदलणार होतं. वचिंत आणि एमआयएमचा फटका प्रणिती शिंदे यांनाच बसण्याची शक्यता आहे. पण आता माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदेना पाठिंबा जाहीर केला. आडम मास्तर यांच्या पाठिंब्यामुळे प्रणिती शिंदे यांची ताकद नक्कीच वाढणार असल्याचे दिसत आहे.
कामगार आपल्या मागे राहतील Adam Master।
काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी नरसय्या आडम यांची माकप कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटीतचं नरसय्या आडम यांनी प्रणिती शिंदेना पाठिंबा देण्याचे आश्वासन देत कामगार आपल्या मागे राहतील असा शब्द दिला. “गेल्या 10 वर्षात याला योग्य गती नाही, विकासाची योग्य दृष्टी नाही, राजकीय ईच्छाशक्तीचा अभाव आहे.” असे म्हणत राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीला आणि राज्यात महाविकास आघाडीला माकपने पाठिंबा जाहीर केला.
दरम्यान सोलापूर शहर मध्यची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मिळावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले या प्रमुख नेत्यांची चर्चा केली आहे. त्यानुसार काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा असे ठरले आहे, जर पक्षश्रेष्ठींकडून असा निर्णय झाला तर मला कोणतीही हरकत नाही असा शब्द सुशीलकुमार शिंदेनी दिल्याचे आडम यांनी सांगितलं.
कट्टर विरोधक मदतीला धावला Adam Master।
कॉम्रेड नरसय्या आडम हे प्रणिती शिंदेंचे कट्टर विरोधक मानले जातात. आडम मास्तर सोलापूर शहरातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. 1978, 1995, 2004 च्या निवडणुकीत नरसय्या आडम यांनी विजय मिळवलेला होता. कामगारांचा नेता अशी ओळख असलेला नरसय्या आडम मास्तर यांचा 2009 च्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी पराभव केला. त्यानंतरच्या सर्वच निवडणुकांमधून प्रणिती शिंदेनी त्यांना पराभवाची धुळ चारली आहे. त्यामुळे ते एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जात होते. मात्र आता हेच विरोधक एकमेकांना साथ देत भाजपच्या विरोधात उभे राहिले आहेत.