मुंबई – ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला आर्यन खानला आज जामीन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत त्याला दिलासा देण्यात आलेला नाही.
आजही त्याच्या जामिनावर कोर्टाकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आर्यन खानला आणखी एक दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे. याप्रकरणी उद्या गुरुवारी दुपारी 2.30 वाजल्यानंतर सुनावणी होणार आहे.
दुसरीकडे न्यायालयात मुनमुन धमेचा याच्या वकिलांनी आपला पक्ष कोर्टासमोर मांडला. मुनमुनने ड्रग्जचे सेवन केले नव्हते. तिच्याजवळ काही सापडलेलेही नाही. त्याशिवाय मुनमुनचा आर्यन आणि अरबाजशी काहीही संबंध नसल्याचे वकिलांनी न्यायालयात सांगितले.