पुणे – मा. शरदचंद्रजी पवार आणि मा. अण्णासाहेब पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त खराडी जिमखाना व आर्या स्पोर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्या स्पोर्टस टी-२० क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत रॉयल पुरंदर, शांताराम बापू कटके या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
खराडी जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत शुभम तैस्वाल(नाबाद ६३ व ४-१८) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर शांताराम बापू कटके संघाने किंग्ज स्पोर्टस संघाचा ७ गडी राखून पराभव केला. दुसऱ्या सामन्यात अद्वैय शिधये ७५ धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर रॉयल पुरंदर संघाने २२ यार्डस संघाचा ७ गडी राखून पराभव केला.
निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
किंग्ज स्पोर्टस : १९.५ षटकात सर्वबाद १४० (रणजीत निकम ३७, शंतनु खेनत ३३, कुणाल थोरात १८; शुभम तैस्वाल ४-१८, ओम माळी ३-२६) पराभुत वि. शांताराम बापू कटके: १६.१ षटकात ३ बाद १४४ (शुभम तैस्वाल नाबाद ६३, यशराज खाडे ४४, ऋतुराज वीरकर १७, ओंकार मोहिते १-२०); सामनावीर – शुभम तैस्वाल.
२२ यार्डस : २० षटकात ९ बाद १९३ (नीरज मोरे ४३, योगराज देशमुख ३८, विशाल मंडळकर ३४, गणेश महापुरे २९; शुभम माने ३-४२, वरुण चौधरी १-२७) पराभुत वि. रॉयल पुरंदर: १६.४ षटकात ४ बाद १९९(अद्वैय शिधये ७५, वैभव चौगुले नाबाद ६६, अथर्व काळे २६, महेश मस्के १२, गणेश महापुरे २-४१); सामनावीर – अद्वैय शिधये.