Pro Kabaddi League 2023-2024 : चेन्नई येथे रविवारी झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या 39 व्या सामन्यात तेलगू टायटन्स संघाची यंदाच्या मोसमातील हाराकिरी कायम राहिली. बंगळूरू बुल्स संघाने त्यांचा 33-31 अशा फरकाने पराभव केला. बुल्सचा हा या हंगातील तिसरा विजय तर टायटन्सचा 6 वा पराभव ठरला.
ತೆಲುಗು ಟೈಟನ್ಸ್ ವಿರುದ್ಧ ಬೆಂಗಳೂರು ಬುಲ್ಸ್’ಗೆ ಜಯ..!😍🥳#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #BLRvTT #BengaluruBulls #TeluguTitans pic.twitter.com/WWv2QTT1R0
— ProKabaddi (@ProKabaddi) December 24, 2023
बुल्सकडून सुरजित सिंगने सर्वाधिक 7 गुण मिळवले तर भरतने 6 गुण घेतले. तर दुसरीकडे टायटन्सचा कर्णधार पवन सेहरावतने 9 रेड पॉइंटसह एकूण 13 गुण घेत दिलेली झुंज व्यर्थ ठरली.
दरम्यान, दुसरीकडे चेन्नई येथे झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या 38 व्या सामन्यात यू मुंबाने बंगाल वॉरियर्सचा 39-37 असा पराभव केला. या मोसमातील 6 सामन्यांनंतर मुंबईचा हा चौथा विजय आहे तर बंगाल वॉरियर्सचा 7 सामन्यांनंतरचा दुसरा पराभव आहे.
#MUMvBEN : मनिंदरचे 1300 रेड पॉइंट पूर्ण
बंगालचा कर्णधार मनिंदर सिंगने इतिहास रचला आहे. त्याने प्रो कबड्डी लीगमधील आपले1300 रेड पॉइंट पूर्ण केले. अशाप्रकारे तो अशी कामगिरी करणारा परदीप नरवालनंतर दुसरा रेडर ठरला. पराक्रमी मनिंदरने आपल्या 129व्या सामन्यात ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.