Akshay Kumar । भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्रीय निवडणूक समितीची आज म्हणजेच गुरुवारी महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत लोकसभेच्या 125 जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली जाणार आहे.
या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय निवडणूक समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत, भाजप आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू शकते. मिळलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचीही नावे पहिल्या यादीत असू शकतात.
दरम्यान लोकसभा निवडणूक उमेदवारांच्या यांची बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचे नाव चर्चेत आले आहे. मिळलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या सर्व सात जागेवर भाजप नव्या चेहऱ्याना संधी देणार असल्याची शक्यता आहे. अशात दिल्लीतील सर्वात जास्त चर्चेत असलेले नॉर्थ-ईस्ट, ईस्ट, चांदनी चौक, नॉर्थ-वेस्ट आणि नवी दिल्ली आहे. यातील चांदनी चौक जागेसाठी भाजप अक्षय कुमाला तिकीट देण्याचा विचार करत आहे.
तत्पूर्वी, भाजपने सातही मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या नावांबाबत फीडबॅक आणि सर्व्हे घेण्यास सुरुवात केली आहे. अशा स्थितीत काही विद्यमान खासदारांचं तिकीटही कापलं जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
Lok Sabha Election bjp । लोकसभा निवडणुकीसाठी मोदी-शहांसह आज होणार भाजप उमेदवारांची यादी जाहीर