पुणे – सह्याद्री, रुबी,जहांगीर, के.ई.एम यांसारखे अनेक नामवंत धर्मादाय रुग्णालये पुण्यामध्ये आहेत. अशा अनेक धर्मादाय रुग्णालयांमध्ये दलालांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गोरगरीब रुग्णाकडून ‘तुमची फाईल मी मोफत करून देतो,’ असे म्हणत त्यांच्याकडून गरज नसतांना अनामत रकमेची मागणी केली जाते. यात बऱ्याचं धर्मादाय रुग्णालयांचेही संगनमत असल्याचे दिसून येते. अशा सर्व रुग्णालयांवर कारवाईची मागणी धर्मादाय आयुक्तांकडे करणार असल्याचे सिद्धार्थ अनिल गिरमे यांनी सांगितले आहे.
पिवळ्या रेशन कार्ड वर गहू तांदूळ मिळणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील रुग्ण, मोलमजुरी करून गोरगरीब कुटुंबातील रुग्णाला सर्रास लुटायचा जणू व्यवसायचं काही धर्मादाय रुग्णालयांनी सुरु केला आहे. परंतुसर्वात प्रथम निर्धन रुग्णांचे बाबतीत धर्मादाय रुग्णालयांनी प्रत्येक विभागातील वैद्यकीय तपासणी व उपचार पूर्णपणे मोफत द्यावयाची असते असा धर्मादाय नियम आहे.
परंतू असे असूनही बरेचं धर्मादाय रुग्णालये मेहनतानाची मागणी त्या गोरगरीब रुग्णाकडून करतात. धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन रुग्णांना दाखल करून घेताना कोणतीही अनामत रक्कम मागायची नसते तरीही त्यांच्याकडून भरमसाठ अनामत रक्कम देण्याची मागणी केली जाते व न भरल्यास आम्ही तुम्हाला दाखल करून घेणार नाही अशी एकाप्रकारे धमकीचं दिली जाते.
येत्या काळात जिल्हास्तरीय वैद्यकीय क्षेत्रातील समितीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून धर्मादाय आयुक्तांकडे अशा सर्व रुग्णालयांची तक्रार केली जाणार आहे. येत्या काळात जर हे गैरप्रकार जर थांबले नाही तर राज्याच्या विधी व न्याय खात्याच्या मंत्र्यांकडे याची जिल्हास्तरीय वैद्यकीय क्षेत्रातील समितीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून लेखी तक्रार करून गोरगरिबांची लूटमार करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करून ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी करणार असल्याचे सिद्धार्थ अनिल गिरमे (नामनिर्देशित सदस्य, जिल्हास्तरीय वैद्यकीय क्षेत्र समिती – विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र राज्य) यांनी सांगितले आहे.