मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी (Arshad Warsi) ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटामुळे घराघरात पोहचला. या चित्रपटातील त्याची सर्किट ही व्यक्तिरेखा सर्वांच्याच पसंतीस पडली होती. त्यानंतर त्याने ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटाला या चित्रपटातही काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. नुकताच तो ‘असुर 2’ या वेबसिरिज मध्ये झळकला होता. चित्रपटांमध्ये आणि वेबसिरीजमध्ये काम केल्यानंतर अरशद आता छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तब्बल सहा वर्षांनंतर तो टीव्हीवर कमबॅक करणार आहे.
अर्शद ‘झलक दिखला जा’ या टीव्ही शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यासोबत फराह खान आणि मलायका अरोरा जज असणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याआधी अर्शद 2017 मध्ये ‘सबसे बडा कलाकार’ या शोमध्ये दिसला होता. या शोमध्ये तो जजही होता. त्यानंतर आता तो तब्बल 6 वर्षानंतर पुन्हा टीव्हीवर झळकणार आहे.
याशिवाय अर्शद ‘सबसे फेव्हरेट कौन’, ‘बिग बॉस’ आणि ‘जरा नचके देखा’मध्ये दिसला होता. त्याने करिश्मा आणि ईशान सपनो को आवाज दो या शोमध्येही काम केले आहे. शोच्या स्पर्धकांबद्दल बोलायचे झाले तर या यादीत अभिनेता शोएब इब्राहिमचे नाव समोर येत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, याआधी अर्शद ‘असुर 2’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आला होता. पहिल्या भागाप्रमाणे या सिरिजच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळालय. यातील त्याच्या भूमिकेचेही कौतुक केले गेले होते.