पुणे – कोंढवा येथील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना खंडणी विरोधी पथक-2 ने अटक केली. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
अभिषेक दशरथ पवार (19, धंदा स्लायडिंग, रा. शिवनेरीनगर कोंढवा बु.) अजय नरसिंग गरड (19, रा. येवलेवाडी, कोंढवा), व विधी संघर्षित बालक अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक अनिल जाधव याचा दि.12 ऑगस्ट रोजी येवलेवाडी येथे कोयत्याने वार करुन खून करण्यात आला होता. यानंतर मुख्य आरोपी अभिषेक पवार व त्याचे साथीदार फरार झालेले होते. तपास करत असताना पोलीस हवालदार सुरेंद्र जगदाळे यांना माहिती मिळाली, की आरोपी अभिषेक व त्याचे साथीदार हे वाघोली चौक येथे येणार आहेत. त्यानुसार तिघांना अटक करण्यात आली.