न्यूयॉर्क : जगामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या करोनाने रोज आपले रूप बदलले आहे. त्यातच दुसऱ्या लाटेला कारणीभूत असणाऱ्या डेल्टा व्हेरियंटविषयी आता एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. डेल्टा व्हेरियंटला रोखण्यासाठी करोना लस अत्यंत प्रभावी असल्याचे सांगण्यात येत आहे.अमेरिकेत झालेल्या नवीन संशोधनात ही माहिती समोर आली आहे.
संशोधनानुसार, लसीकरणानंतर शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीजपासून डेल्टा प्रकार देखील सुटू शकत नाही. लसीकरण केलेले लोक डेल्टा व्हेरिएंटच्या संपर्कातून का वाचले, याविषयी जर्नल इम्यूनिटीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यास अहवालात माहिती देण्यात आली आहे.
वॉशिंग्टनच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी, फायझरच्या कोविड लसीतून लोकांच्या शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीजचा अभ्यास केला. शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की, डेल्टा व्हेरिएंट लसीद्वारे तयार केलेल्या अँटीबॉडीज व्यतिरिक्त इतर कोणासही चकमा देऊ शकत नाही. तथापि, करोनाचे बीटा व्हेरिएंट अनेक अँटीबॉडीजपासून बचाव करण्यात यशस्वी झाले.
वॉशिंग्टन विद्यापीठातील प्रोफेसर अली एल्बेडी यांना आढळले की नैसर्गिकरित्या निर्माण होणारी अँटीबॉडीज आणि लसीमुळे तयार होणारी अँटीबॉडीज संसर्गानंतर जास्त काळ टिकतात. तथापि,अँटीबॉडीज कालावधी तसेच त्यांची श्रेणी, म्हणजेच ते किती प्रकारांच्या विरोधात प्रभावी आहेत, याविषयीचा अभयास देखील संशोधकांनी केला आहे.