मुंबई – अकलूज येथे एका तरुणाने दोन जुळ्या मुलींशी विवाह केल्याच्या घटनेची सगळीकडेच जोरदार चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओने तर सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला. जुळ्या मुलींसोबतच्या या विवाहाची चर्चा इतकी जोरदार झाली की महिला आयोगाने या प्रकाराची दखल घेतली. परंतु यानंतर आता अशा अनेक प्रकरणांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे युट्युबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन्हही बायका चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
प्रसिद्ध युट्युबर अरमान आणि त्याच्या दोन बायका कृतिका मलिक आणि पायल मलिक यांचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. हे तिघेही सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारचा कन्टेन्ट बनवत असतात. जुळ्या मुलींसोबतच्या विवाहनानंतर या परिवाराची सध्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. पायल आणि कृतिका दोघीही एकत्र गरोदर राहिल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या दोघींचे फोटो देखील खूप व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये दोघींनी एकसारखे कपडे घातलेले आहेत. म्हणूनच नेटकरी आता अकलूज प्रकरण सोडून या युट्युबरवर चर्चा करताना दिसत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी आता यावर मिम्स देखील शेअर करायला सुरुवात केली आहे. तर काहींनी दोन बायका असलेली अशी अनेक प्रकरणे असल्याचे सोशल मीडियावर सांगितले आहे.