मुंबई – अभिनेत्री करिना कपूर आपल्या अभिनयासोबतच फिटनेससाठी देखील प्रसिद्ध आहे. आपल्या कौटुंबिक जीवनामुळे करीना सध्या मोठ्या पडद्यापासून लांब असली तरी ती नेहमी चर्चेत असते. नुकतंच करिनाने आपल्या इंस्टाग्रामवरून एक व्यायाम करतानाच व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
स्लिम फिट राहण्यासाठी अनेकदा अभिनेत्री जिममध्ये वर्कआऊटसाठी जास्त वेळ घालवतात. यावेळी त्या एखादा व्हिडीओ देखील शोष मीडियावर पोस्ट करत असतात. करिनाने देखील हेच केले. फिटनेससाठी एकेकाळी बोलीववूडमध्ये ‘झिरो फिगर’ ट्रेंड सेट करणाऱ्या करिनाला मात्र यावेळी जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागलाय. अनेकांनी करिनाला का व्यायाम करतीय ? कोणता चित्रपट येणार आहे ? असे सवाल देखील विचारले आहेत.
View this post on Instagram
अनेक ट्रोलर्सने ‘तिसऱ्या मुलाची तयारि सुरु आहे का ? असे देखील विचारले आहे. तर अनेकांनी तिला आंटीचा रोल करण्यासाठी धडपडत असल्याचे म्हंटले आहे. बेबोची मेहनत पाहून चाहते मात्र खुश झालेत त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना बॉयकॉट करा असा सल्ला देखील दिला आहे.