मुंबई – मेगास्टार अमिताभ बच्चन आणि साऊथची सुंदर अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांची बाप – लेकीची जोडी सध्या धमाल करत आहे. दोघेही ‘गुडबाय’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना यांचा आगामी फॅमिली ड्रामा चित्रपट ‘गुडबाय’चा ट्रेलर एका शानदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. यादरम्यान, चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट उपस्थित असताना, अमिताभ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लॉन्च इव्हेंटमध्ये सामील झाले. एकता कपूरने कॅमेऱ्यासमोर तिच्या सर्वात मोठ्या भीतीबद्दल खुलासा केला आणि त्याबद्दल सांगताना ती खूप भावूक झाली आणि रडली.
‘गुडबाय’च्या ट्रेलरमध्ये हे स्पष्ट होते की रश्मिकाची आई नीना गुप्ता हिचा काही कारणाने मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारावरून रश्मिका आणि अमिताभ बच्चन यांच्यात जोरदार वादावादी झाली. चित्रपटातील या दृश्याबद्दल बोलताना एकता कपूर म्हणाली,’आई-वडील गमावण्यापेक्षा मोठे दु:ख नाही. लोक याला कसे सामोरे जातात हे मला समजत नाही. आपण सर्व आपल्या पालकांशी खूप वाद घालतो आणि रागात अशा अनेक गोष्टी बोलतो ज्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. पण प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला भीती वाटते.’ एकता कपूर पुढे म्हणाली, ‘हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. माझा चित्रपट एका कुटुंबावर आहे.’
अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय या चित्रपटात नीना गुप्ता, सुनील ग्रोव्हर आणि पावेल गुलाटी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. विकास बहल दिग्दर्शित ‘गुडबाय’ 7 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.