घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे कामे लवकर करण्याच्या सुचना
नगर – घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची कामे हरिद लवादाने दिलेल्या सुचनेनुसार एजन्सीने लवकरात लवकर करावीत. मनपाला हरित लवादाकडून दंड झाल्यास तो दंड संबंधित एजन्सीकडून वसूल केला जाणार असल्याचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले. महापौर वाकळे यांनी घनकचारा व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामाचा आढावा बैठक घेतला यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक महेंद्र गंधे, संपत बारस्कर, कुमार वाकळे, अजय ढोणे, अजय चितळे, प्रकल्प अभियंता आर.जी.मेहेत्रे, ठेकेदार हेमंत उपरे, एम. एल. भाटी, रोहित कुराणे आदी उपस्थित होते.
यावेळी वाकळे यांनी 100 मेट्रीक टन खत प्रकल्पासाठी आवश्यक असणारी मशिनरी बसविणे व देखभाल दुरूस्तीचे काम मायो व्हेसेल्स अण्ड मशिन्स प्रा.लि.औरंगाबाद यांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेला असून, मशिनरी बसविणेसाठी आवश्यक असणारे सिव्हील वर्कचे काहीकाम करण्यात आले आहे. उर्वरित 31 जानेवारी 2020 पूर्वी करण्यात येईल त्यामुळे आपण मशिनरी बसविणे बाबत कार्यवाही करावी असे, एजन्सीचे एम.एल.भाटी यांना सांगितले.
आपल्या कामाच्या दिरंगाई मुळे हरिद लवाद यांनी महानगरपालिकेस दंडाची कार्यवाही केल्यास दंडाबाबतची रक्कम आपल्याकडून वसुल केली जाईल. तसेच पी. एच. जाधव यांचेकडे 1 लाख घनमीटर जुना कचऱ्यावर बायोमायनिंग द्वारे प्रक्रिया करण्याचे काम आहे. त्यामुळे जुना पडलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. मीरा क्लिनफ्युएल लि. मुंबई यांचेकडे 5 टीपीडी क्षमतेचे 2 बायोमेथीनायझेशन प्लॅट उभारणे व एक वर्षे देखभाल दुरूस्तीचे काम आहे. या प्रकल्पापासून गॅस तयार होणार आहे. एका प्लॅन्टमध्ये हॉटेल व इतर ठिकाणावरून जनावरांचे अवशेषावर प्रक्रिया व एका प्लॅन्टमध्ये खराब झालेल्या भाजीपाल्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या कामाचे पाहणी 21 डिसेंबर रोजी करण्यात येणार असून, त्यापूर्वी काम पूर्ण करणे बाबत सुचना दिल्या.