बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर राजकीय आणि सामाजिक मुद्यांवर आपले रोकठोक मत सोशल मीडियावर व्यक्त करत असते. स्वरा भास्करने नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात ट्वीट केले आहे. सोमवारी रात्री लोकसभेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयक बहुमताने मंजूर झाल्यानंतर स्वरा भास्करने मोदी सरकारवर तोफ डागली आहे.
स्वरा भास्करने ट्वीट केले आहे की, (भारतामध्ये…) नागरिकत्व धर्माच्या आधारावर नाही. धर्माच्या आधारावर भेदभाव होऊ शकत नाही. राज्य धर्माच्या आधारावर निर्णय घेता येऊ शकत नाही. नागरिकत्व दुरूस्ती विधेयकातून मुस्लिमांना दूर ठेवण्याचा डाव आहे.’ NRC/CAB प्रोजेक्टमधून मोहम्मद अली जिना यांचा पुनर्जन्म झाला आहे. “हॅलो हिंदू पाकिस्तान!’ याव्यतिरिक्त स्वरा भास्करने आणखी एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, “माझ्या मेहनतीची कमाई टॅक्सच्या रूपात आजारी NRC/CAB योजनेवर खर्च व्हावी, अशी माझी अजिबात इच्छा नाही.’
दरम्यान, नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून बॉलिवुडमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. याविरोधात काही कलाकारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून निषेध दर्शविला होता. तर काही कलाकारांनी याला पाठिंबाही दर्शविला आहे.