नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोलकाता पोर्ट ट्रस्टचे नामकरण श्यामा प्रसाद मुखर्जी ट्रस्ट करण्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
यासंदर्भामध्ये कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने दि. 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीमध्ये कोलकाता बंदराचे नाव बदलण्याचा ठराव केला होता. त्यानुसार या बंदराचे नामवंत न्यायाविद, बहुभाषांचे अभ्यासक, शिक्षणतज्ञ, अलौकिक बुद्धिमान, विचारवंत आणि जनसामान्यांचे नेते श्यामा प्रसाद मुखर्जी ट्रस्ट असे नामकरण करण्यात येणार आहे. कोलकाता बंदराच्या दीडशेव्या वर्धापनदिन उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये नामांतराची घोषणा करण्यात आली होती.
डॉ. मुखर्जी त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी तसेच पश्चिम बंगालच्या विकासाचे कार्य केले. डॉ. मुखर्जी यांचे कार्य सर्वांना प्रेरणादायी तसेच औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देणारे होते. तसेच त्यांनी “एक राष्ट्र एक कायदा’ या धोरणासाठी कार्य केले.