नाग नदीचे प्रदूषण कमी करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी

नवी दिल्ली – नाग नदीतील प्रदूषण कमी करण्याच्या प्रकल्पासाठी 2,117.54 कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. नागपूर शहरातून वाहणारी ही नदी सांडपाणी आणि औद्योगिक कचऱ्यामुळे अत्यंत प्रदूषित बनली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपल्या कार्यालयात जागतिक बॅंकेचे अधिकारी, “एनएमसीजी’चे महासंचालक आणि नागपूर महानगरपालिका आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा केली.

राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेला हा प्रकल्प राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालय, “एनआरसीडी’ राबवणार आहे. नाग नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये वाहणारे प्रक्रिया न झालेले सांडपाणी, घनकचरा आणि अन्य अशुद्ध घटकांच्या बाबतीत प्रदूषणाची पातळी यामुळे कमी होईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.