पुणे (प्रभात वृत्तसेवा) – बाळासाहेबांची शिवसेना पक्षांच्या उपजिल्हाप्रमुखपदी शिक्षकांचे नेते संभाजी शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील व जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्या हस्ते शिरसाट यांना उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्तीचे पत्रही देण्यात आले आहे. शिरसाट यांच्याकडे भोसरी, खेड-आळंदी या विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
संभाजी शिरसाट हे शिवसेना प्रणित शिक्षक सेनेच्या पुणे विभागीय अध्यक्षपदावर कार्यरत होते. शिरसाट हे बाळासाहेबांच्या विचारांचे कट्टर शिवसैनिक असून त्यांनी शिक्षक सेनेच्या माध्यमातून बऱ्यादा आंदोलने करुन शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्याला सतत प्राधान्य दिवून न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे.
यामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी त्यांनी केला संघर्ष व व्यापक कामामुळे त्यांचा पुणे जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आहे. शिरसाट हे सुशिक्षित, अभ्यासू व आक्रमक शिक्षक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ प्रकारे शिक्षणाचा लाभ मिळवून दिला जातो आहे.
शिरसाट हे त्यांच्या आक्रमक शैलीमुळे पिंपरी-िंचंचवड, चाकणसह पुणे जिल्ह्यातच प्रसिध्द आहेत. सन 2020 च्या पुणे विभागाच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत ते शिवसेनेचे दावेदारही होते.
शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणांवर निष्ठा ठेवून, प्रामाणिकपणे, कसोटीने पक्ष बांधणी करुन सामाजिक कार्य करण्याचे आदेशही बजाविण्यात आले असून या आदेशानुसार शिरसाट यांच्याकडून सक्षमपणे अंमलबजावणी होणार आहे.