पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जांसाठी बुधवारपासून दुपारी 4 वा. सुविधा उपलब्ध होणार आहे.
शाळांच्या नोंदणीसाठी 21 जानेवारी ते 11 फेब्रुवारी अशी मुदत दिली आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळांना नोंदणी वाढविण्याबाबत वारंवार सूचना दिल्या आहेत. राज्यातील 9 हजार 230 शाळांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये 1 लाख 13 हजार 895 प्रवेशाच्या जागा दर्शविल्या आहेत. मागील वर्षापेक्षा नोंदणीत वाढ झाली आहे. यात नवीन शाळांचा नोंदणीत समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील 934 शाळांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असून 16 हजार 295 प्रवेशाच्या जागा दर्शविल्या आहेत. 29 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.