पर्थ : अर्जेंटिनाचा टेनिसपटू ज्युआन मार्टिन डेल पोट्रोने आगामी ऑस्ट्रोलियन ओपन ग्रँडस्लम टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. गुडघ्याच्या दुखापतीतून अद्याप सावरलो नसल्याने ऑस्ट्रोलियन ओपन स्पर्धेत खेळू शकत नाही, असे ३१ वर्षीय पोट्रोने सांगितले आहे.
Our two-time quarterfinalist Juan Martin del Potro has withdrawn from #AusOpen 2020 as he continues to recover from a knee injury.
Wishing you all the best with your recovery @delpotrojuan. We hope to see you back in Australia soon 🦘🇦🇺 pic.twitter.com/XNWd7u0ilT
— #AusOpen (@AustralianOpen) January 10, 2020
पोर्टोला ही दुखापत मागील वर्षीच्या विबंलडन स्पर्धेत झाली होती, पण अद्याप तो या दुखापतीमधून सावरलेला नाही.
दरम्यान, डेल पोर्टोने २००९ आणि २०१२ मध्ये ऑस्ट्रोलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम-८ मध्ये प्रवेश केला होता. २०१५ पासून त्याने फक्त एकदा या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
या स्पर्धेत डेल पोर्टो याच्याआधी अद्यापपर्यंत जपानच्या केइ निशिकोरीने आणि ब्रिटनचा दिग्गज टेनिसपटू अँडी मरे यांनी देखील ऑस्ट्रोलियन ओपनमधून माघार घेतली आहे.