चार महिन्यांत राम मंदिर बांधण्याचा अमित शहांचा निर्धार

जबलपूर  : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. ‘राम मंदिर चार महिन्यांत बांधण्यात येणार आहे’ असे शहा यांनी सांगितले. अमित शहा मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) संदर्भात आयोजित ‘जनजागृती रॅली’ला संबोधित करत होते.

शहा म्हणाले, “काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल म्हणतात की राम मंदिर बनू नये. तुम्ही राम  मंदिराचे काम थांबवून दाखवा. असे आव्हान त्यांनी काँग्रेसला केले आहे. चार महिन्यात राम मंदिर बाधणारच असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, ‘भाजप देशाच्या हिताचे राजकारण करीत आहे. विरोधक मात्र व्होटबँकच्या राजकारणामुळे ‘का’ कायद्याला विरोध करीत आहेत’.

गृहमंत्री म्हणाले, “समाजात  तेढ निर्माण केली जात आहे,  नागरिकांची विरोधक दिशाभूल करीत आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही.”ते म्हणाले, “भारतातील तुमचे माझे जेवढे अधिकार आहेत तितकेच अधिकार पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन निर्वासितांचे आहेत.”

जवाहलाल नेहरू विद्यापीठात घडलेल्या घटनेसंदर्भात शाह म्हणाले देश विरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकायचे का नाही ? जे देश विरोधी घोषणा देणार त्यांची जागा तुरुंगातच आहे. मताच्या राजकारणात राहुल गांधी आणि केजरीवालांची भाषा पाकिस्तान सारखी झाली आहे असा टोला त्यांनी लगावला.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.