Asha Bhosle : आपल्या मखमली आणि वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने सात दशकांहून अधिक काळ गाजवलेल्या सर्वांच्या लाडक्या आशा भोसले ( Asha Bhosle ) यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत संगीताला नवा आयाम दिला आहे. आशा भोसले ( Asha Bhosle ) यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत.
आशा भोसले यांचे वैयक्तिक आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते. मात्र, आशा भोसले कधीही कुणापुढे झुकल्या नाही आणि त्यांनी परिस्थितीशी तडजोड देखील केली नाही त्या आपल्या आयुष्याचे निर्णय आपल्या मतानुसार घेत.
नेहमीच आपल्या मखमली आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशा भोसले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. ‘लोफर’ चित्रपटातील ‘कोई शहरी बाबू…’ या लोकप्रिय गाण्यावर आशा भोसले आणि अभिनेत्री मुमताज ( mumtaz ) डान्स करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये दोन दिग्गज स्टार्स एकत्र नाचताना दिसत आहेत, हे पाहून लोकांना जुने दिवस आठवत आहेत. मुमताजचा तिच्याच गाण्यावरचा डान्स अप्रतिम दिसतो, तिच्याकडे पाहून गेल्या पाच दशकात तिच्या शैलीत काही बदल झाला असेल असं वाटत नाही.
व्हिडिओमध्ये आशा भोसले यांनी ऑफ व्हाइट कलरची साडी परिधान केल्याचं दिसत आहेत, तर मुमताजने काळ्या रंगाचा सूट घातला आहे. 1973 मध्ये आलेल्या लोफर चित्रपटातील हे गाणे मुमताजवर चित्रित करण्यात आले होते आणि ते आशा भोसले यांनी गायले होते.
50 वर्षांनंतर दोन्ही स्टार्स पुन्हा एकाच गाण्यावर एकत्र नाचताना दिसत आहेत, ही चाहत्यांसाठी खूप मोठी भेट असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. सध्या या व्हायरल व्हिडिओवर फॅन्स लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.