सिंधुदुर्ग – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi in malvan) यांच्या हस्ते सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं (Chhatrapati shivaji maharaj statue) अनावरण करण्यात आलं.तारकर्ली या ठिकाणी याबाबतचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह,केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस यांचीही उपस्थिती होती. (PM Modi in sindhudurg)
“आजचा हा ऐतिहासिक दिवस आपल्याला आशीर्वाद देत आहे. मालवण तारकर्लीचा हा किल्ला.. छत्रपती शिवरायांचा हा पुतळा सर्वांना प्रेरणा देत आहे.” असे गौरवोद्गार यावेळी पंतप्रधान मोदींनी काढले. तसेच यावेळी बोलताना पंतप्रधानांनी नौसेनेच्या प्रत्येक अधिकाऱ्याला आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या.(Neavy day)
VIDEO | PM Modi unveils the statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Sindhudurg, Maharashtra. pic.twitter.com/nPO1r2ZZYl
— Press Trust of India (@PTI_News) December 4, 2023
आज सिधुदुर्गाच्या भूमीतून नेव्हीच्या अधिकाऱ्यांना शुभेच्छा देणं सर्वांसाठी गौरवाचे आहे.आजच्या दिवशी मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्यांना देखील प्रणाम करतो असं देखील पंतप्रधान यावेळी म्हणाले. (Pm modi on neavy day)
पंतप्रधान पुढे म्हणाले,”छत्रपती वीर शिवाजी महाराजांना माहिती होत कि प्रत्येक देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्वाच आहे. जो समुद्रावर नियंत्रण ठेऊ शकतो तो सर्व शक्तिमान आहे हे त्यांचं ब्रीद होत. त्यांनी एक शक्तिशाली नौसेना बनवली होती. कानोजी आंग्रे,हिरोजी इंदलकर असे अनेक योद्धे आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. असं देखील पंतप्रधान यावेळी म्हणाले.