नवी दिल्ली – इंग्लंडचा माजी कसोटीपटू केविन पीटरसन याच्याशी सोशल मीडियावर संवाद साधत असतानाच विराटला अनुष्काने ऑर्डर दिली. चक्क सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे त्यानेही इन्स्टाग्रामवर सुरु असलेल्या चर्चेतून सभात्याग केला. चॅटिंग खूप झाले, चल जेवणाची वेळ झाली अशी ऑर्डर अनुष्काने केली आणि पत्नीची आज्ञा शिरसावंध मानून विराट पीटरसनबरोबरच्या चर्चेतून क्विट झाला. चाहत्यांनीही विराटच्या या कृतीची गंमत अनुभवली व बायको ती बोयकोच असते अशी प्रतिक्रीया पोस्ट केली.
दरम्यान, इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) अद्याप एकही विजेतेपद मिळवू शकलो नाही हे मान्य, पण भविष्यात ते स्वप्न आम्ही निश्चितच पूर्ण करु. केवळ मैदानावरील कामगिरी नव्हे तर ड्रेसिंगरुममधील खेळाडूंमध्ये खेळीमेळीचे वातावरण असणे जास्त महत्वाचे आहे, असे मत रॉयल चॅलेंजर बेंगळूरू (आरसीबी) संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले आहे. इंग्लंडचा माजी कसोटीपटू केविन पिटरसन याच्याशी कोहलीने सोशल मीडियावर सुरु असलेल्या एका चॉट-शोमध्ये संवाद साधला त्यावेळी हे मत व्यक्त केले.
तुम्ही अद्याप एकदाही ही स्पर्धा का जिंकू शकला नाही, असा सवाल या संवादादरम्यान पीटरसनने कोहलीला विचारला होता, त्यावर कोहलीने हे उत्तर दिले.