“लार्जर दॅन लाइफ’ सेट, दमदार कलाकार, उत्कृष्ट कथानक व दिग्दर्शन यांच्या जोरावर “बाहुबली’च्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमविला होता. “बाहुबली : द बिगनिंग’ हा चित्रपट एका अशा निर्णायक वळणावर येऊन संपला होता की, संपूर्ण जगाला “बाहुबली : द कन्क्लुजन’ या दुसऱ्या भागाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जो विक्रम रचलाय, तो अद्याप कोणत्याही चित्रपटाला मोडता आला नाही. या चित्रपटामुळे त्यातील कलाकारांना जगभरात लोकप्रियता मिळाली. यामध्ये देवसेनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टीने तगडं मानधन घेतले होते.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनेत्रींना फारसं मानधन दिले जात नाही, असे बोलले जाते. मात्र, अनुष्का याला अपवाद ठरली आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत तिची गणती होते. अनुष्का एका चित्रपटासाठी चार कोटी रुपये घेते. “बाहुबली 2′ या चित्रपटासाठी अनुष्काने तब्बल 5 कोटी रुपयांचे मानधन घेतले होते.
दरम्यान, अनुष्काचे खरे नाव स्विटी शेट्टी असे असून तिने कारकिर्दीत 30 हून अधिक तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या नावावर “बाहुबली’, “रुद्रम्मादेवी’, “अरुंधती’सारख्या हिट चित्रपटांची नोंद आहे. अनुष्काने चित्रपटसृष्टीसाठी स्वत:चे नाव देखील बदलले आहे.