अनुजा, अपराजिता यांना विजेतेपद

पुणे: क्रीडा व सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे व पुणे स्क्वॅश रॅकेट संघटना यांच्या तर्फे आयोजित विभागीय शालेय स्क्वॅश स्पर्धेत तान्या अनुजा, अपराजीता सिंग आणि श्रृती माने यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

वाकड येथील डेव्हिड लॉयड तळवलकर्स क्‍लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत 14 वर्षांखालील मुलींच्या गटात पुण्याच्या सेंट मेरीज स्कुलच्या तान्या अनुजा हिने वालचंदनगरच्या श्री वर्धमान विद्यालयाच्या गायत्री सोनटक्केचा 11-7, 11-8, 11-9 असा पराभव केला.

17 वर्षाखालील मुलींच्या गटात पुण्याच्या इंडस इंटरनॅशनल स्कूलच्या अपराजिता सिंगने सोलापुरच्या श्री वीरतपस्वी चंद्रवीर शिवाचार्य हायस्कूलच्या संध्या डोंगेस्वामीचा 12-10, 11-5, 11-9 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 19 वर्षांखालील मुलींच्या गटात पुण्याच्या सिंबायोसीस कॉलेज ऑफ आर्टस्‌ अँड कॉमर्सच्या श्रृती मानेने सोलापुरच्या गांधीनाथा रंगजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या समृद्धी कदमचा 9-11, 12-10, 11-4, 11-8 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण क्रीडा व सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्यचे सहसंचालक डॉ. जयप्रकाश डुबालेम, पुणे जिल्हा क्रिडा आधिकारी विजय संतान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे स्क्वॅश रॅकेट संघटनेचे सचिव आनंद लाहोटी, पुणे स्क्वॅश रॅकेट संघटनेचे अध्यक्ष कालिदास मगर, डेव्हिड लॉयड क्‍लबचे सरव्यवस्थापक अनिश श्रीवास्तव, क्रीडा अधिकारी शिवाजी कोळी, प्रो स्क्वॅश अकादमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.