मुंबई – बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अनु मलिक बऱ्याच काळापासून आरोपांमध्ये घेरले जात आहे. जेव्हा मी टू चळवळमध्ये त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले तेव्हा अनु मलिक यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली. यातच काही दिवसांपासून ते सिंगिंग रिअलिटी शो इंडियन आयडॉलच्या 11 व्या सीझनमध्ये परीक्षक म्हणून दिसत होते. मात्र, आता अनु मलिक यांनी हा शो मध्येच सोडल्याचं बोललं जात आहे.
My open letter to the honourable minister for women & child development.??. @smritiirani ,I hugely admire you, your tenacity & commitment to work for the welfare of people in India & I request you to please read this.Many more women are writing in to me privately about this man?? pic.twitter.com/Z8bU8RG528
— ShutUpSona (@sonamohapatra) November 21, 2019
दरम्यान, अनु मलिक यांनी इंडियन आयडॉलच्या 11 सोडण्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसेल तरी, लैंगिक शोषण आरोपामुळे त्यांनी हा शो सोडल्याची माहिती पिंक विला या नामांकित वृत्त संस्थेने दिली आहे. तत्पूर्वी,2018 मध्ये सोना मोहपात्रानं पहिल्यांदा अनु मलिक यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला होता. त्यावेळी अनु मलिक यांना इंडियन आयडॉल 10 सुद्धा अर्ध्यावरुनच सोडावा लागला होता.