श्रीगोंदा (प्रतिनिधी) –तालुक्यात पुन्हा एक करोना संशयित आढळला असून त्या डॉक्टरचा श्रीरामपूर येथील करोना पॉझिटिव्ह व्यक्तीशी संपर्क आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, त्या डॉक्टरला नगर येथे क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मिळाली.
याबाबत सविस्तर असे की, श्रीरामपूर येथील एक व्यक्ती 21 मे रोजी श्रीगोंदयात आली होती. त्यांनी श्रीगोंदयातील एका डॉक्टरकडे मुक्काम देखील केला होता. त्यावेळी ‘त्या’ श्रीरामपूरच्या व्यक्तीचा करोना तपासणी अहवाल निगेटिव्ह होता. परंतु, आता श्रीरामपूरच्या त्या व्यक्तीचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले श्रीगोंद्यातील डॉक्टर करोना संशयित बनले आहेत. त्यांना नगर येथे हलविण्यात आले असून क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.