वाघोलीत आत्तापर्यंत खाजगी लॅबच्या कोरोना रिपोर्टचे एकूण चार पॉजिटीव्ह रुग्ण सापडले
वाघोली: दोन दिवसापूर्वी खाजगी लॅबच्या कोरोना रिपोर्टमध्ये पॉजिटीव्ह आलेल्या दोघांच्या संपर्कातील ४३ जणांच्या केलेल्या टेस्ट मध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीचा खाजगी लॅबचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचे काम चालू आहे. वाघोलीत आत्तापर्यंत खाजगी लॅबच्या कोरोना रिपोर्टचे एकूण ४ पॉजिटीव्ह रुग्ण सापडले आहेत.
खाजगी लॅबच्या कोरोना रिपोर्टमध्ये बुधवारी (दि.१५) एक ४५ वर्षीय व्यक्ती, शुक्रवारी (दि.१७) ४२ वर्ष व २४ वर्षाचे दोघे जण पॉजिटीव्ह सापडले आहेत. दोघांच्या संपर्कात आलेल्या एकूण ४३ जणांची खाजगी लॅबमध्ये कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये दोघांच्याही कुटुंबातील व्यक्तींचा टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे तर संपर्कातील इतर ५० वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट रविवारी (दि.१९) पॉजिटीव्ह आला आहे. पॉजिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील व कुटुंबातील नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राकडून केले जात आहे. पॉजिटीव्ह आलेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाची कोणतीही ठोस लक्षणे दिसून आली नसली तरी त्याला उपचारासाठी पुणे शहरामध्ये हलविण्यात आले असून त्याच्या कुटुंबातील व्यक्तींची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे. वाघोलीत आत्तापर्यंत खाजगी लॅबच्या कोरोना रिपोर्टचे एकूण ४ पॉजिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. चारही जणांवर उपचार सुरु आहेत.
वाघोलीत कोरोनाच्या पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे त्याचबरोबर आगामी काळातही रुग्ण वाढण्याची चिन्हे दिसत असल्याने आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरातच राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.