पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात करोना विषाणूने बाधित रुग्ण आढळत असले तरी दुसरीकडे उपचारानंतर रुग्ण बरेही होत आहेत. दिल्ली येथील मरकजमधील धार्मिक कार्यक्रमातून आलेल्यांच्या “हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील एक महिला करोनामुक्त झाली आहे. तिचे दोनही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या महिलेला सोमवारी घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे मागीत तीन दिवसात पाच रुग्ण करोनामुक्त झाले आहे.
“हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधून या महिलेला करोना विषाणूची लागण झाली होती. या महिलेवर महापालिककेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. चौदा दिवसांच्या उपचारानंतर या महिलेची दोन्ही तपासणी अहवाला निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे या महिलेला घरी सोडण्यात आले आहे.
दिल्लीतील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमातून आलेल्या रुग्णांपैकी एकाला शुक्रवारी तर दोघांना शनिवारी घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 18 झाली आहे.