नऊ रुग्ण ठणठणीत : तीन रुग्णांची प्रकृती स्थिर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयात 14 दिवसांचे उपचार घेऊन आठ रुग्ण ‘कोरोनामुक्त’ होत ठणठणीत झाले आहेत. रविवारी पाच रुग्णांच्या दुस-या चाचणीचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यांना ‘डिस्चार्ज’ देण्यात आला. तर आणखी एका रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला रविवारी रात्री घरी सोडण्यात आले.
तीन दिवसात आठ रुग्ण ‘कोरोनामुक्त’ झाल्याने शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. तर, आणखी एका रुग्णाचे पहिले रिपोर्ट शनिवारी निगेटिव्ह आले होते. त्यानंतर रविवारी त्याचा दुसराही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तो करोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यालाही घरी सोडण्यात आले आहे. आता केवळ तीन करोना बाधित रुग्ण आहेत. तर, मागील नऊ दिवसात शहरात एकही नवीन ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळला नाही. त्यामुळे शरवासियांना दिलासा मिळाला आहे.